DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगचे वसतिगृह दुमदुमले

मुलींच्या वसतिगृहात श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

जळगाव  : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना सोहळा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण वसतिगृह परिसर दुमदुमून गेला. या मंगलमय सोहळ्यास डॉ. उल्हास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. प्रेमचंद पंडित, प्रमोद भिरूड, अधीक्षिका हर्षा कोल्हे, प्राचार्या प्रा. डॉ. विशाखा गनवीर, उपप्राचार्या प्रा. जॅसिंथ धया, डी.के.पी.सी.ओ.एन.चे प्राचार्य शिवानंद बिरादार, मुख्य परिचारिका अधीक्षक संकेत पाटील तसेच उपमुख्य परिचारिका अधीक्षिका मनीषा खरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात पुरोहित संदीप का. वैद्य यांच्या मंत्रोच्चाराने झाली. कर्मचारी गणेश नांदुरकर यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना केली. त्यानंतर महाआरती करण्यात आली. वसतिगृहातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी सर्वांच्या सुख-शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यशासाठी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.