DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे शिबिर

विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिर

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणीकृत तृतीयपंथीय व्यक्तींना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी मंदिरासमोर, जळगाव येथे एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात मतदान कार्ड, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती व आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन तसेच संबधित सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यातील केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणीकृत तृतीयपंथीय व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.