DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवाभावी उपक्रम

जळगाव : भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगर यांच्या वतीने भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. तसेच भाजपा अल्पसंख्यांक आघाडीच्या वतीने नागरिकांना फळांचे वाटप करण्यात आले.

‘सेवा हीच संघटनाची शक्ती’ या विचारातून समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या भावनेने हा उपक्रम राबविण्यात आला. या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमास जळगाव लोकसभा खासदार स्मिता ताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा), भाजपा जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक परदेशी, माजी जिल्हा महानगर अध्यक्ष उज्वला ताई बेंडाळे, जळगाव शहराच्या महापौर दीपमाला ताई काळे, भाजपा मनपा गटनेते प्रकाश बालाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दीपक परदेशी, ललित बडगुजर, प्रकाश पंडित, मयुर भदाणे, मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, अल्पसंख्यांक अध्यक्ष परवेज पठाण, संजय नारखेडे, अनिल जोशी, आकाश मंडोरे, तुषार सूर्यवंशी, हर्ष सिखवाल, चंदू महाले, युवराज सपकाळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवींद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून ‘सेवा, समर्पण व राष्ट्रसेवा’ या संकल्पाला बळ देण्यात आले. जनसेवेच्या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.