DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कडधान्य अभियानासाठी महाडीबीटीवर अर्ज करा

हरभरा व मसूर पीक प्रात्यक्षिकासाठी हेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान

जळगाव : कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत रब्बी हंगाम २०२६-२७ साठी हरभरा व मसूर पिकांच्या पीक प्रात्यक्षिकासाठी अनुदान देण्यात येणार आहे. हरभरा व मसूर या दोन्ही पिकांसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी हरभरा पिकासाठी १८० हेक्टर आणि मसूर पिकासाठी ७० हेक्टर भौतिक लक्षांक प्राप्त झाला आहे. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे.

यासाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटीच्या ‘बियाणे’ घटकांतर्गत हरभरा व मसूर पीक प्रात्यक्षिकासाठी अर्ज करावा. शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर केली जाणार आहे.

प्रति गट कमाल २५ शेतकरी आणि प्रति गाव, प्रति पिकासाठी जास्तीत जास्त दोन गट निवडले जातील. लाभार्थी शेतकरी सभासदाकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच संबंधित गट, कंपनी व सहकारी संस्थांना हमीपत्र देणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, शेतकरी गट व उत्पादक कंपन्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.