DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अनंत चतुर्दशीला गणेश मंडळांचा गौरव; खडसे यांच्या हस्ते सन्मान

जळगाव : अनंत चतुर्दशी निमित्त २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महानगर जळगाव यांच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध गणेश मंडळांचे हार व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम आमदार एकनाथराव खडसे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भैय्यासाहेब रविंद्र पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, महानगर जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कल्पिताताई पाटील, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, जिल्हा चिटणीस गुंजन महाजन, उपाध्यक्ष अमोल कोल्हे, डॉ. अभिषेक ठाकूर व सरचिटणीस रमेश पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी धर्मराज फाऊंडेशनचे अध्यक्ष विनायक पाटील, संग्रामसिंग फाऊंडेशनचे डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी तसेच उदासी डोळ्यांचे हॉस्पिटलचे डॉ. राहुल उदासी यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या योगदानाबद्दल आमदार एकनाथराव खडसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील व महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन व महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी यांनी केले. उपस्थितांचे आभार महानगर कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, राजुभाऊ मोरे व महानगर युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.