जिल्हा बँकेत रविवारी अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण
राजकीय दिग्गजांची मांदियाळी : उपस्थितीचे संजय पवार यांनी केले आवाहन
जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्रत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा रविवारी दि. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते आणि विविध राजकीय पक्षांचे धुरंधर उपस्थित राहणार असल्याची माहिती चेअरमन संजय पवार यांनी पत्रपरिषदेत दिली.
पुतळा अनावरणाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा बँकेच्या रिंग रोडवरी मुख्य इमारतीच्या आवारात निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. त्यानंतर सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम शहरातील महाबळ परिसरात छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भूषवणार आहेत. पुतळ्याचे अनावरण जलसंपदा तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पर्यटन व राजशिष्टाचार राज्यमंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांची मुख्य उपस्थिती असेल.
पुतळा अनावरण कार्यक्रमास राज्यसभेचे खासदार उज्ज्वल निकम, खासदार स्मिता वाघ, आमदार एकनाथराव खडसे, आमदार अनिल पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार नंदकिशोर महाजन, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. माजी प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अमित तायडे, जिल्हा उपनिबंधक महेश गायकवाड हे प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहतील.
उपस्थितीचे आवाहन
दिवंगत अजित पवार यांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी बांधव, विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व संचालक मंडळाने केले आहे. अजित पवार यांनी राज्याच्या राजकारणासह सहकार क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याची आठवण जपत त्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे.
