DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

इंदिरा गांधी व राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन

जळगाव : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय शौर्य गाजविणाऱ्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव महानगर जिल्हा कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आकाशवाणी चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी आणि जळगाव जिल्हा समन्वयक विकासदादा पवार यांच्या हस्ते दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, स्व. इंदिरा गांधी यांनी भारताची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. त्यांच्या कणखर नेतृत्वामुळे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारताने ऐतिहासिक विजय मिळविला. बांगलादेशच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच गरिबी निर्मूलनासाठी त्यांनी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली १९७४ मध्ये पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी केली. त्यांचे धाडसी निर्णय, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा आजही प्रेरणादायी आहेत.

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, राणी लक्ष्मीबाई यांनी शिक्षणासोबतच घोडेस्वारी, धनुर्विद्या आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतले होते. आपल्या प्रजेवर त्यांचे अपार प्रेम होते. इंग्रजांविरुद्ध त्यांनी अतुलनीय शौर्याने लढा दिला. ‘मै अपनी झांसी नहीं दूंगी’ हा त्यांचा निर्धार स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर झाला आहे.

कार्यक्रमाचे आभार जिल्हा महानगर कार्यालयाचे सरचिटणीस सुनील माळी यांनी मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, जळगाव शहर विधानसभा प्रमुख जयप्रकाश महाडिक सर, सामाजिक न्याय विभाग प्रमुख रमेश बारे, प्रदेश सरचिटणीस जयप्रकाश चांगरे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष गणेशभाऊ पाटील, अमोलभाऊ कोल्हे, किरणभाऊ राजपूत, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष रफीक पटेल, महानगर जिल्हा चिटणीस नईम खाटीक, राजुभाऊ बाविस्कर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.