राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत निलेश पाटील ला सुवर्ण
जळगाव | प्रतिनिधी
वसई विरार येथील ग्रीन पॅराडाईज रिसॉर्ट, अर्नाळा येथे ३३ व्या वरिष्ठ महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ३५ जिल्हय़ातील ४०० पुरूष व महिला खेळाडूंनी यात यशस्वी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघटनेचे ७ मुले व ४ मुली असा संघ सहभागी झाला. यात पुरुषांमध्ये ५४ किलो आतील वजन गटात निलेश पाटील याने पुण्याचा दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू निनाद पांगारे यास मात देऊन सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला. निनाद हा सहा वेळचा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला मातब्बर खेळाडू होता, तायक्वांडो मध्ये फिन वजन गटात सुवर्णपदक पटकावणारा निलेश हा संघटनेचा दुसरा खेळाडू ठरला. याआधी विशाल बेलदार याने या वजन गटात सुवर्णपदक मिळवून दिले आहे .
निलेश पाटील च्या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, नरेंद्र महाजन, सुरेश खैरनार, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, अरविंद देशपांडे, तसेच रावेर तालुका अध्यक्ष दिपक नगरे, स्वामी स्पोर्ट्स चे अध्यक्ष रविंद्र पवार, डॉ. संदिप पाटील, सुरेश महाजन, राजेंद्र पाटील, जिवन महाजन यांनी कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.