DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘लाडकी बहीण’ योजनेला 98.55 कोटींचा बूस्टर; ई-केवायसीनंतर थांबलेले हप्ते मार्चमध्ये एकत्र मिळणार?

महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ई-केवायसी पडताळणीनंतर लाभार्थ्यांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी राज्य सरकारने योजनेसाठी मोठा निधी वितरीत केला आहे.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून 98 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 960 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यातून हा हफ्ता देण्यात येत आहे.

गेल्या वर्षी या योजनेचा लाभ राज्यातील 2.4 कोटींहून अधिक महिलांनी घेतला होता. मात्र ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेनंतर लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले नव्हते, त्यांचा लाभ डिसेंबर 2025 पासून थांबवण्यात आला होता. आता पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थींना प्रलंबित हप्ते एकत्रित स्वरूपात देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मार्च महिन्यात हा हफ्ता मिळू शकतो, अशी माहिती समोर येत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.