मोठी बातमी : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता दिल्लीत ‘यलो अलर्ट’ जारी
नवी दिल्ली | वृत्तसंस्था
कोरोनानं देशभरात हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ पहायला मिळत आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली सरकारनं महत्त्वाची पाऊलं उचलली आहे.
दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये कोरोनाचा रेट वाढत आहे. त्यामुळे यलो अलर्ट अंतर्गत निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी, सम-विषम नियमानुसार दुकाने, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत खुली राहतील, उद्योगधंदे सुरू राहणार, बांधकाम क्षेत्राला दिलासा, कामे सुरू ठेवण्यास परवानगी, उपाहरगृहे सकाळी 8 ते रात्री 10 यावेळेत तर बार हे दुपारी 12 ते रात्री 10 यावेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, सभागृह अनिश्चित काळासाठी बंद राहणार, हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, पण कार्यक्रमाचे हॉल बंद राहणार, असे नवीन निर्बंध असणार आहेत.
दरम्यान, कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅननं आता डोकं वर काढलं आहे. त्यामुळे आता संसर्ग वाढत चालला असून तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओमिक्राॅनमुळं तिसरी लाट येऊ शकते, असा इशाराही तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.