मा.गटविकास अधिकारी पं.स. अमळनेर यांना ग्रा.पं. कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यानं संदर्भात दिले निवेदन
महाराष्ट्र राज्य ग्रा.पं. कर्मचारी संघटना 4511 अमळनेर या संघटनेच्या पदाधिकारी यांनी अमळनेर पं.स. चे गटविकास अधिकारी मा. श्री.एकनाथ चौधरी साहेब यांना ग्रा.पं. कर्मचाऱ्याच्या किमान वेतन, राहणीमान भत्ता, प्रा. फंड, सेवा पुस्तक, थकित पगार व कर्मचानां विमा संरक्षण मिळावे. अशा स्वरूपाच्या मागण्यानचे निवेदन देण्यात आले.
ग्रा.पं. कर्मचारी हा ग्रामसेवकाच्यां खांद्याला खांदा लावुन काम करत असतो. तरी कर्मचाऱ्यानां पगाराचा ग्रा.पं. हिस्सा मिळत नाही. तालुक्यातील अनेक कर्मचाऱ्याचे गेल्या 15 ते16 महिन्याचे वेतन थकीत आहे. कर्मचाऱ्याचें अकस्मात निधन झाल्यास त्याच्या परिवाराला शासनाकडुन कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही म्हणुन सर्व कर्मचाऱ्यानां विमा संरक्षण मिळावे. अशा विविध समस्या मा.गटविकास अधिकाऱ्यानं समोर मांडण्यात आल्या.
कर्मचाऱ्याच्यां मागण्या मान्य न झाल्यास 1 मार्च पासुन तालुक्यातील सर्व ग्रा.पं. चे कर्मचारी हे काम बंद आंदोलन करतील.
निवेदन देतानां संघटनेचे अमळनेर तालुकाध्यक्ष श्री.नरेंद्र पाटील , उपाध्यक्ष श्री.रविंद्र पाटील, सचिव श्री. सुभाष पाटील , संघटक श्री.सतिष पाटील, पं.स. लिपीक श्री.अनिल पाटील, श्री. अजबराव पाटील इ. उपस्थितीत होते.