प्रभावती गिरधारीलाल ओसवाल यांचे निधन
जळगाव | प्रतिनिधी
जैन उद्योग समूहाचे संस्थापक सदस्य श्री. गिरधारीलाल ओसवाल यांच्या धर्मपत्नी सौ. प्रभावती ओसवाल-देसर्डा (वय 74) यांचे निधन आज दि. 22 डिसेंबर 2022 ला झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता श्रीश्री लेक रेसीडेंसी, शिरसोली रोड या निवासस्थानावरून जैन हिल्सच्या प्रांगणातील मोक्षधाम येथे जाईल. त्यांच्या पश्चात पती गिरधारीलाल ओसवाल, मुलगा आनंद ओसवाल, दोन मुली जावाई नातवंडे आदी परिवार आहे.