पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळवर जीवघेणा हल्ला, 4गोळ्या झाडल्या
पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. शरद मोहोळवर अज्ञात हल्लेखोरांनी सुतारदरा कोथरूड इथं गोळीबार केला आहे. यात मोहोळला 4 गोळ्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यात कोथरूड इथं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी मोहोळेवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात मोहोळला 4गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याला तातडीने वनाज सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्याच्या गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
काही महिन्यापूर्वीच शरद मोहोळ याची पत्नी हिने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर शरद मोहोळ ही अनेक हिंदुत्ववादी संघटनाच्या व्यासपिठावर उघडपणे वावरत होता. आज त्याच्या लग्नाचाही वाढदिवस होता. दुपारी सुतारदरा येथील राहत्या घरून तो दुचाकीवरून बाहेर पडला तेव्हा चार हल्लेखोरानी त्याला घेरून जबरदस्त गोळीबार केला. यातल्या चार गोळ्या मोहोळ याला लागल्यात. त्याच्यावर वनाज येथील सह्याद्री हॅास्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.