DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेर मतदारसंघात तीन दादांमध्ये निवडणुकीचा आखाडा रंगणार

जळगाव : महायुतीच्या जागावाटपाच्या सूत्रात अमळनेर विधानसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ताब्यात जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा बाकी असल्याने या मतदारसंघात मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा विरुद्ध शिरिषदादा या दोन दादांमध्ये लढत होईल, शिरिषदादा या दोन दादांमध्ये लढत कृषिभूषण साहेबराव पाटलांची एंट्री झाल्यास अमळनेर मतदारसंघात तीन दादांमध्ये निवडणुकीचा आखाडा रंगलेला पाहायला मिळेल. भाजपकडे असलेली अमळनेरची जागा महायुतीत सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून येथून मंत्री अनिल पाटलांच्या नावावर निर्विवाद शिक्कामोर्तब होईल. माजी आमदार चौधरी हे मतदारसंघात दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवारीचा प्रयोग करणार आहेत. मंत्री अनिल पाटील हे सव्वा वर्षांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांच्या जोरावर आखाड्यात उतरतील तर शिरीष चौधरी हे मंत्री पाटलांना विविध प्रश्नांवर लक्ष्य करतील. २०१९ च्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरलेल्या माजी आमदार शिरीष चौधरींना नंदुरबारचे पार्सल परत पाठवायचे म्हणून त्यांचा पराभव घडवून अनिल पाटलांना विधानसभेवर पाठविण्यासाठी विशिष्ट खेळी खेळली गेली होती. त्यामागे वाघांनी बाजार समिती पाहावी व कृषिभूषण साहेबराव पाटलांना नगरपालिकेची जहागिरी देण्याबाबत वाटाघाटी घडल्या होत्या. चौधरी भाजपचे उमेदवार असताना तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्षांनी अनिल पाटलांना आर्थिक ‘रसद’ सह छुपा पाठिंबा दिला होता. साहेबराव पाटलांनीही संपूर्ण ताकद अनिल पाटलांच्या मागे लावली होती. यावेळी मात्र स्वतः साहेबराव पाटलांना शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. तर वाघ हयात नसल्याने यावेळी अनिल पाटलांना वाघ यांच्या पत्नी, खा. वाघ यांच्या मदतीने विधानसभा गाठायची आहे.

अपक्षाचा प्रयोग दोन वेळा यशस्वी
या विधानसभा मतदार संघात १९५१ पासून आजपर्यंत दोन वेळा अपक्षांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. २००९ कृषिभूषण साहेबराव पाटील तर २०१४ च्या निवडणुकीत शिरीष चौधरी अपक्ष निवडून आले होते. यावेळी पुन्हा शिरीष चौधरींच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारीचा प्रयोग होणार आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील याना गेल्या विधानसभा निवडणुकीत ९३७५७ मते पडली होती. त्यांची एकूण मतांची टक्केवारी ५१.१० होती. भाजपचे शिरिष चौधरी यांना ८५१६३ मते मिळाली होती त्यांची एकूण मतांची टक्केवारी ४६.४० त्यात एकूण मतांचा वाटा होता. इतकी होती.

पाडळसे प्रकल्प कळीचा मुद्दा
तापी नदीवरील सर्वात मोठा निम्न तापी सिंचन प्रकल्प हा १९९५ पासूनच्या नदीवरील सर्वात मोटा निम्न तापी सिंचन प्रकल्प हा १९ २५ पानाच्या यांनी तत्कालीन शिवसेना भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. तेव्हाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याचा पश्चिम पट्टयातील शेतकऱ्यांचा आरोप आहे. मंत्री अनिल पाटलांनी प्रकल्पाला थोडी गती देण्याचा प्रयत्न केला. ४८९०.७७ कोटींच्या चौथ्या सुप्रमा व्यतिरिक्त या प्रकल्पासाठी सरकारने एकरकमी मोठी रक्कम दिलेली नाही.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.