शहरातून चोरीच्या ३९ दुचाकी जप्त
शहर आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्यांनी मिळून बजावली कामगिरी
जळगाव – शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या दुचाकी चोरीचा छडा लावण्यात जळगाव शहर आणि जिल्हापेठ पोलिसांना मोठे यश आले आहे. जळगाव शहर पोलिसांनी चोरीच्या १९ तर जिल्हापेठ पोलिसांनी तब्बल २० दुचाकी अशा ३९ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर विभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांनी शहर पोलीस स्टेशन येथील गुन्हें शोध पथकातील कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन करत सुचना दिल्या होत्या. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या पथकाने शहरातील एम.एम मास्टर तिजोरी गल्ली येथून चोरी झालेल्या दुचाकीचा शोध सुरू केला. गुन्हे शोध पथकाचा तपास चालू असतांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळवून व नेत्रम येथील कर्मचारी मुबारक देशमुख यांच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पडताळणी करुन घेवुन व त्याचेकडून फुटेज प्राप्त केले. त्यानंतर हा उपलगडा झाला आहे.