DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तरसोद फाट्यावर धावत्या कारला अचानक आग

जळगाव : भुसावळ येथून जळगाव शहरात येत असलेल्या धावत्या कारमधून धूर निघून कारला आग लागल्याची घटना तरसोद फाट्याजवळील हॉटेल राधाकृष्णजवळ गुरुवारी रात्री 9.45 वाजता घडली. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी फायर एक्सटिंग्विशरने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
भुसावळकडून जळगाव शहराकडे जात असलेल्या कारमध्ये एक दांपत्य व त्यांची मुलगी प्रवास करीत होते. कारमधून अचानक धूर निघत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तरसोद फाटा येथील हॉटेल राधाकृष्ण जवळ कार थांबवली. कार थांबताच कारने पेट घेऊन रौद्र रूप धारण केले. यावेळी जवळच असलेल्या हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी दोन फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, कारने प्रवास करणार्‍या कुटुंबीयांना हॉटेल व्यवस्थापनाने आधार दिल्याचे गिरीश जावळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.