DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावकरांनी अनुभविला म्युझिकल एक्सरसाइज योगा

ब्रह्माकुमारीज्चा अभिनव उपक्रम : आरोग्य संपदा संगीत योगाचे उद्घाटन

जळगाव : योगासने प्राणायाम यांचे महत्व सर्व जाणतात. शारीरिक स्वास्थ्यासाठी हजारो लोक सकाळी धावतात, प्राणायाम आसने करतात परंतु यात शारीरिक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ्यासाठी मेडिटेशनल म्युझिकल एक्सरसाईज अर्थात ध्यान संगीतमय योगाचे अभिनव प्रयोग सुरु केलेत ते ब्रह्माकुमारीज् वैद्यकिय प्रभागाने. कर्णमधुर संगीताच्या तालावर व्यायामाचा नवीन उपक्रमाची अनुभुती जळगावकरांनी केली. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मेडिकल प्रभागाद्वारे आरोग्य क्षेत्रातील अभिनव उपक्रमाची सुरुवात ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर राजयोग मेडिटेशन ॲण्ड ट्रेनिंग सेंटर, सावखेडा येथे झाली.

ध्यान संगीत योग पद्धतीने तन आणि मन स्वास्थ राहण्यास होते मदत – डॉ. उज्ज्वल कापडणीस, म्युझिकल एक्सरसाईज म्हणजे ध्यान संगीतमय योगामध्ये आपले नेहमीचे आसने, शारीरिक कसरती ह्या मेडिटेशन गीत आणि संगीताच्या माध्यमातून योग शिक्षकाद्वारे नियंत्रीत केले जातात. यामुळे मनास अगदी ताजेतवाने आणि प्रसन्न वाटते. शारीरीक स्वास्थ्याबरोबर मन आणि आत्म्यास शक्तिशाली बनविणे हा यामागील उद्देश असल्याचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. उज्ज्वल कापडणीस, शंभर हून अधिक ठिकाणी याचे आयोजन होते. सुरुवातीस सावखेडा येथील दिव्य प्रकाश सरोवर येथे हा उपक्रम सुरु झालेला आहे. जळगाव शहरात लवकरच ढाके कॉलनी, महाबळ आणि इतर ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

दररोज होईल आयोजन : दरारोज सकाळी ६ ते ७ आणि संध्याकाळी ६ ते ७ या दरम्यान ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर, सावखेडा, खोटेनगर, महाबळ, ढाके कॉलनी येथे ब्रह्माकुमारीज् शाखेत याचे आयोजन होणार असून योग संगीत आणि गीतांच्या माध्यमातून होणा·या तन-मन स्वास्थ्यासाठी रोज होणा·या या अभिनव उपक्रमास वाढता प्रतिसाद लक्षात घेता सुरुवातीस प्रा. अविनाश कुमावत हे प्रशिक्षक म्हणून असतील. शहरात ठिक-ठिकाणी छोट्या योग शिबिरासाठी त्यांनी योग सेवकातूनच योग शिक्षकांची मोठी फळी तयार केली असून अनेक योग शिक्षक आता मार्गदर्शन करीत आहेत. ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदींच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहर आणि जिल्हयात असे उपक्रम विविध ठिकाणी राबविले जातील ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले.

योग सेवकांचे अनुभव :  या प्रसंगी योग सेवकांनी प्रातिनिधिक स्वरुपात अनुभव सांगितलीत त्यात नाशिक आणि मालेगाव येथील प्रा. अशोक शिंदे, शैलेश चव्हाण, प्रा. जगदिश खैरनार, योगेश पवार, सचिन निकम, हर्षाली निकम, आशा शिंदे, उज्ज्वला बच्छाव, किरण शेवाळे, आश्विनी पाटील, शिवाजी मोरे, उज्ज्वला बोरसे यांचा समावेश होता.

उदघाटन : तत्पूर्वी उपक्रमाचे उदघाटन डॉ. उज्ज्वल कापडणीस, डॉ. मनिषा कापडणीस, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, डॉ. सुमन लोढा, प्रा. अविनाश कुमावत, आदिंच्या शुभहस्ते झाले. सूत्रसंचलन ब्र.कु. वर्षा बहन तर आभार ब्र.कु. राज बहन यांनी मानले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.