DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिचीच्या संशोधन समितीवर नियुक्ती

जळगाव – जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ व उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर नुकतीच निवड करण्यात आली. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी अभिनंदन केले.

डॉ. के.बी. पाटील यांचा केळी पिकाचा दीर्घ अनुभव
डॉ . के. बी. पाटील हे गेल्या तीस वर्षापासून केळी पिकाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. केळी उत्पादन तंत्रज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन करून जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात क्रांती केली आहे. केळीची काढणी पूर्व व काढणी पश्चात हाताळणी आणि निर्यात यासाठी तीस वर्षे काम करून केळीची निर्यात वाढविली. केळीसाठी गादी वाफा, मल्चिंग, फाॅस्फोरीक अॅसिडचा वापर, वर्षभर केळीसाठी फर्टिगेशनचे तंत्रज्ञान केळीसाठी २०० ग्रॅम नत्र, ७० ग्रॅम स्फूरद व ४०० ग्रॅम पालाश प्रति झाड, फ्रुट केअर पद्धती असे अनेक तंत्रज्ञान देशात त्यांनी प्रथमच विकसीत केले. जैन टिश्यूकल्चर ग्रॅडनैन या विदेशी जातीला संपूर्ण देशात लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जगातील सर्व प्रमुख केळी उत्पादक देशांना भेटी दिलेल्या असून त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे. केळीबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. केळी पिकाचा प्रचंड अभ्यास व अनुभव अधोरेखीत करत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी डाॅ. के.बी. पाटील यांची संशोधन सल्लागार समितीवर निवड केली आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.