कुटुंबातीलच नातं बनलं जोडपं: पतीच्या उपस्थितीत पुतण्याशीच काकूचा विवाह
पटना (बिहार): प्रेमाच्या नावाखाली सामाजिक रचना धक्क्यात टाकणारी एक घटना बिहारच्या जमुई जिल्ह्यात समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या पुतण्यासोबतच विवाह केला असून, विशेष म्हणजे या विवाहप्रसंगी तिचा माजी पतीही उपस्थित होता.
सदर प्रकरण जमुई जिल्ह्यातील सिकहरिया गावातील आहे. विशाल दुबे यांच्या पत्नी आयुषी कुमारी हिने त्यांच्याच पुतण्याशी, सचिन दुबे याच्याशी विवाह केला आहे. हा विवाह २० जून रोजी गावातील मंदिरात पार पडला.
विशाल व आयुषीचा विवाह २०२१ मध्ये झाला होता. या दाम्पत्याला तीन वर्षांची एक मुलगी आहे. मात्र आयुषी आणि सचिन यांच्यात मागील दोन वर्षांपासून गुपचूप संबंध सुरु होते. मोबाईलवरील संवाद व भेटीगाठीतून त्यांचे नाते अधिक दृढ झाले.
गेल्या रविवारी आयुषी आणि सचिन अचानक घरातून निघून गेले. यानंतर विशालने पत्नीच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. याच दरम्यान आयुषीने घटस्फोटासाठी जमुई न्यायालयात अर्ज दाखल केला. पुढे दोन्ही कुटुंबांमध्ये सामोपचार झाल्यानंतर आयुषी आणि सचिनचा विवाह पार पडला.
या विवाहप्रसंगी आयुषीचा माजी पती विशालही उपस्थित होता. त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, “तिने जर स्वतःचा आनंद निवडला असेल, तर मी आडकाठी आणणार नाही. मात्र मी तिच्याशी आणि माझ्या मुलीसोबत कधीही वाईट वागलो नाही, तरीही ती आम्हाला कायम दुर्लक्षित करत असे.”
दुसरीकडे, नवविवाहित सचिन दुबे म्हणतो, “गेल्या दोन वर्षांपासून आम्ही एकमेकांवर प्रेम करत होतो. आता आमच्या नात्याला नाव मिळाले आहे. मी आयुषीला आयुष्यभर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीन.