लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार 0% व्याजदराने कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती
दिव्यसारथी न्यूज नेटवर्क | मुंबई :
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा ₹1500 मिळवणाऱ्या महिलांसाठी आणखी एक सुवर्णसंधी! आता या लाभार्थी महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबई बँकेच्या सहकार्याने, महिला उद्योजक घडवण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे.
कर्ज योजना कशी काम करेल?
-
महिलांना ९% व्याजदराने कर्ज दिलं जाईल.
-
मात्र, राज्य सरकारच्या चार महामंडळांमार्फत त्या व्याजाचा संपूर्ण परतावा केला जाणार आहे.
-
त्यामुळे लाभार्थी महिलांसाठी प्रत्यक्षात हे कर्ज ‘0% व्याजदराचे’ ठरणार आहे.
ही चार महामंडळं कोणती?
-
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ
-
पर्यटन संचालनालय (आई योजना)
-
वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ
-
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ
कर्ज कशासाठी मिळेल?
-
व्यवसाय उभारणी
-
लघुउद्योग
-
स्वयंरोजगार
मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, “ज्या महिला या योजनांच्या निकषांत बसतील त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते.”