DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

CISCE झोनल बॅडमिंटन स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूल चे वर्चस्व

जळगाव – सीआयएससीई झोनल बॅडमिंटन स्पर्धा -2025 छत्रपती संभाजी नगर येथे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल दि. 7 ते 8 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनुभूति निवासी स्कूलच्या बॅडमिंटनपटूंनी वर्चस्व गाजविली. छत्रपती संभाजीनगर , नाशिक, पालघर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील बॅडमिंटनपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.

अनुभूती स्कुलचा निकाल
U14 मुले:
– दिव्येश बागमार – एकेरी उपविजेते (दुसरे स्थान)
– इंदर अग्रवाल आणि शिवा देवसरकर – दुहेरी उपांत्य फेरीत (तृतीय स्थान)
U17 मुले:
– दिव्यांश बैद आणि चिन्मय पाटीदार – दुहेरी उपांत्य फेरीत (तृतीय स्थान)
U19 मुले:
– मानस बुलानी – एकेरी चॅम्पियन (प्रथम स्थान)
– श्रेनिक संचेती – एकेरी उपांत्य फेरी (तृतीय स्थान)
– कृष्णा क्षीरसागर आणि अक्षत लछेटा – दुहेरी चॅम्पियन्स (प्रथम स्थान)

विद्यार्थ्यांना बॅडमिंटन प्रशिक्षक किशोर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचै कौतुक अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी, जयेश बाविस्कर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.