DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नागपूरमध्ये स्फोटक निर्मिती कंपनीत भीषण स्फोट; १ ठार, १७ जखमी

नागपूर : शहरातील स्फोटक निर्मिती करणाऱ्या महत्त्वाच्या औद्योगिक युनिटमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटात एक जण ठार तर १७ जण जखमी झाले. या कंपनीत देशाच्या संरक्षण विभागासाठी अनेक महत्त्वाची उत्पादने तयार केली जात असल्याने घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

स्फोटामुळे उडालेल्या मलब्यात दोन कामगार गंभीर जखमी झाले. काही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळाजवळील २०० मीटर अंतरावर असलेल्या लॅबमध्ये हे सर्व जखमी कामगार कार्यरत होते.

जखमींना अमरावती रोडवरील दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, काहींना धंतोली येथील राठी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रात्री व आज सकाळी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या मदतीने सहा जखमींना तातडीने नागपूरकडे रवाना करण्यात आले.

दरम्यान, स्फोटानंतर परिसराला सुरक्षा कवच देण्यात आले असून कंपनीच्या आत कोणालाही प्रवेशबंदी आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार व जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्यासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रत्यक्षात स्फोटाच्या वेळी किती कामगार उपस्थित होते याची माहिती मात्र कंपनी व्यवस्थापनाकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.