DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

माजी महापौरच्या फार्म हाऊसमध्ये बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

जळगाव पोलिसांचा मोठी कारवाई; विदेशी नागरिकांना लाखो रुपयांची फसवणूक करणारे ८ जण अटकेत

जळगाव – शहरातील मुराबाद रोडवर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फ़ार्म हाऊसमध्ये चालत असलेले बनावट कॉल सेंटर पोलिसांच्या ताब्यात आले आहे. या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे यांसह एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांशी संपर्क साधून त्यांना ऑनलाईन फसवणूक केली जात होती. आतापर्यंत या प्रकरणात अनेक नागरिक लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतील तरुण या कॉल सेंटरमध्ये काम करत होते. त्यांनी विविध ऑनलाईन कंपन्यांची नावे सांगून विदेशी नागरिकांना फसवण्याचे काम केले. हे बनावट कॉल सेंटर फक्त २० दिवसांपूर्वी सुरू झाले असून, त्या कालावधीतच पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की, या कॉल सेंटरच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीचा सखोल तपास सुरू आहे, तसेच जळगाव शहरातील तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.