DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भुसावळमध्ये नमो युवा रन मॅरेथॉन उत्साहात ; हजारो तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळमध्ये नमो युवा रन मॅरेथॉन उत्साहात ; हजारो तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नशामुक्त भारत या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आलेली मॅरेथॉन २०२५ – नमो युवा रन रविवारी भुसावळमध्ये अतिशय उत्साहात पार पडली. या निमित्ताने संपूर्ण शहर नमोमय झाले होते.

रेल्वे ग्राउंडवरून सुरुवात झालेल्या या धावण्याचा मार्ग हंबर्डीकर चौक, लोखंडी पूल, शिवाजी कॉम्प्लेक्स, पांडुरंग टॉकीज, मोटुसोबराज चौक असा ठेवण्यात आला होता. पुन्हा रेल्वे मैदानावर परत येत सुमारे तीन किलोमीटर अंतराचा हा रन पूर्ण झाला. पुरुष, महिला, शालेय मुले आणि शालेय मुली असे चार स्वतंत्र गट ठेवण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व बलून सोडून करण्यात आले. यावेळी मंडळ रेल्वे प्रबंधक सुनील कुमार सुमन, आर. के. मीना, गिरीश महाजन, अमोल महाजन, जयंत माहूरगड, आनंद ठाकरे, अनिल वारके, निखिल वायकोळे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल यांसह विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🏆 विजेतेपद निकाल:

पुरुष गट: प्रतीक सोनवणे (प्रथम), आदित्य जाधव (द्वितीय), लकी खरारे (तृतीय)

महिला गट: रेणुका धनगर (प्रथम), गायत्री माळी (द्वितीय), अश्विनी रोझोदे (तृतीय)

शालेय मुले: निलेश इंगळे (प्रथम), रोहित बावणे (द्वितीय), योगेश शिरसाळे (तृतीय)

शालेय मुली: पूर्वा बाविस्कर (प्रथम), हर्षाली वाणी (द्वितीय), राखी महाजन (तृतीय)

स्पर्धेचे संयोजन व परीक्षक म्हणून डॉ. प्रदीप साखरे, विलास पाटील, मनोज वारके, मेघश्याम शिंदे, मुकेश मोरे आदींनी कार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीक्षित बऱ्हाटे, भाजप पदाधिकारी, क्रीडा शिक्षक महासंघ, तालुका ऍथलेटिक्स असोसिएशन तसेच रेल्वे प्रशासनाने मोलाचे सहकार्य केले.

या निमित्ताने भुसावळकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नशामुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचला असून, शहरातील वातावरण उमेद व ऊर्जेने भारावून गेले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.