DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात रोटरी क्लबतर्फे ‘जीवन संजीवनी’ CPR प्रशिक्षण

जळगाव | गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथे रोटरी क्लब जळगाव आणि सोसायटी ऑफ अ‍ॅनेस्थेशिऑलॉजिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने *जीवन संजीवनी – आपत्कालीन उपचार व CPR प्रशिक्षण कार्यक्रम* उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष *गिरीश कुलकर्णी*, सचिव *सुभाष अमळनेरकर*, कार्यकारी सचिव *पंकज व्यवहारे*, देवगिरी प्रांत मेडिकल विभाग प्रमुख व ICU स्पेशॅलिस्ट *डॉ. लीना पाटील*, जनरल फिजिशियन *डॉ. सुनील सुर्यवंशी*, *डॉ. जयश्री राणे* आणि *सुबोध सराफ* उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. विजयकुमार पाटील* यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले.

रोटरी क्लब अध्यक्ष *गिरीश कुलकर्णी* यांनी आपत्कालीन प्रसंगी योग्य वेळी दिलेल्या मदतीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचाराचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. यानंतर *डॉ. लीना पाटील* यांनी सीपीआरची गरज, तंत्र, ‘गोल्डन अवर’चे महत्त्व, हृदय बंद पडल्यास घेण्याची तातडीची पावले, छाती दाबण्याची योग्य पद्धत आणि rescue breaths याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिक सत्रात विद्यार्थ्यांना CPR, पल्स तपासणी, प्रतिसाद तपासणी, श्वासमार्ग खुले करणे यांची हाताळणी करून दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वास्तविक परिस्थितीत कशी कृती करावी हे शिकले.

कार्यक्रमाचे समन्वयक *डॉ. ललिता पाटील* होते. AI & DS विभाग प्रमुख *डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा* यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन *प्रा. खुशाली बेलदार* यांनी केले.

समारोप प्रसंगी प्राचार्य *डॉ. विजयकुमार पाटील* यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानत विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण समाजहितासाठी उपयुक्त ठरेल असे सांगितले. पुढील काळातही अशा जीवनावश्यक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल *गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील व डॉ. अनिकेत पाटील* यांनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.