निर्यातीत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल जैन इरिगेशनला प्लेक्स कौन्सिलची आठ पारितोषिके
ड्रीप इरिगेशन, पीव्हीसी फोमशीट फिटींग व होजेस विभागास निर्याती बद्दल झाला सन्मान
‘गुणवत्ता ही बाजारपेठेमध्ये विकत मिळत नसते तर ती प्रत्यक्ष जीवनात उतरावी लागते’ हे श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे विचार प्रत्येक सहकाऱ्यांमध्ये संस्कारीत झाले आहे. यातून कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्यास प्रत्येक सहकारी प्रयत्न करत आहे. प्लास्टिककल्चरतून शेतीला कमीत कमी संसाधनातून उत्कृष्टतेकडे घेऊन आले आहे. जैन इरिगेशनच्या सहा दशकाच्या कार्याला अधोरेखित करुन १९९१ पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहे. कंपनीच्या विविध विभागांमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा व भूमिपुत्रांच्या कष्टांना समर्पित हा पुरस्कार असल्याचे मी मानतो.– अशोक भवरलाल जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव