DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पिंपरखेडमध्ये दुहेरी मृत्यूची खळी

तीन दिवसांत एकाच तलावातून दोन मृतदेह

भडगाव । भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे अवघ्या तीन दिवसांच्या अंतरात एकाच तलावातून दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिली घटना १४ नोव्हेंबर रोजी समोर आली. वाल्मीक संजय हयाळींगे (वय २७) यांचा मृतदेह सरकारी दवाखान्यासमोरील तलावात आढळला. ते ११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून बेपत्ता होते. त्याचदरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी तलावाशेजारील हॉटेलमध्ये काम करणारे नारायण रामदास हयाळींगे (वय ५२) हेही रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले. अखेर, १६ नोव्हेंबर रोजी त्यांचाही मृतदेह त्याच तलावात आणि जवळजवळ त्याच ठिकाणी सापडला.

अगदी एकाच ठिकाणी, तीन दिवसांच्या अंतराने दोघांचे मृतदेह सापडल्याने घातपात, खून आणि परस्पर संबधीत संशयांच्या चर्चा गावात जोरात सुरू आहेत. वाल्मीकच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, त्याला शेवटचे मित्रासोबत नारायण हयाळींगे यांनी पाहिले होते. त्यामुळे नारायण यांच्यावरही हल्ला झाला असावा किंवा ते साक्षीदार असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले असावे, असा दावा करण्यात येत आहे.

या दुहेरी मृत्यूची निष्पक्ष चौकशी आणि मारेकऱ्यांच्या तात्काळ अटकेच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांनी एरंडोल–भडगाव महामार्गावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. शवविच्छेदन इन-कॅमेरा करण्याचीही त्यांनी मागणी केली. पोलिसांनी तपासाची हमी देत काही संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.