खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ, गृहिणींचं बजेट कोलमडलं
नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाला आहे. खाद्य तेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सणासुदीच्या तोंडावर गृहिनींच्या किचन बजेट कोलमडणार आहे.खाद्यतेलांचे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने बाजारात खाद्यतेल व्यापाऱ्यांना ३१ मार्च २०२२ पर्यंत तेल साठा करण्यावर मर्यादा आणली होती त्याचा परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो १५ ते २० रुपयाने घसरण झाली होती. मात्र सानसूदीच्या काळात खाद्य तेलाची मागणी वाढल्याने पुन्हा तेलाचे दर वाढले आहेत.
सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार नजर ठेवून आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई होऊन वचक बसेल असे बोलले जात असताना भाव वाढत आहेत. दरम्यान दर नियंत्रणात आणण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विक्रमी १२.६२ लाख टन पाम तेलाची आयात केली असताना देखील खाद्य तेलाच्या भावात अजून वाढ होण्यास सुरुवात झाली.