धनंजय मुंडेंवर आणखी एक संकट
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. यांसदर्भात स्व:ता मुंडे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
धनंजय मुंडे यांचे फेसबुक पेज हॅक झाले असून याविषयी ते माहिती देताना म्हणाले की, माझे अधिकृत फेसबुक पेज @DPMunde हे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा संशय आहे. याबाबत @FacebookIndia व @MahaCyber1 कडे रीतसर तक्रार नोंदवली आहे.
धनंजय मुंडे फेसबुक पेजच्या माध्यंमातून नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत असतात. या पेजद्वारे ते मतदासंघातील तसेच इतर महत्वाची माहिती वेळीवेळी सादर करत असतात मात्र त्यांना हे पेज हॅक झाल्याचा संशंय आहे. यासंर्दभात त्यांनी फेसबुक इंडियाकडे व सायबर विभागाकडे तक्रा दाखल केली आहे.