DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महायुतीविरोधात बंडखोरी; भाजपकडून २७ जणांवर हकालपट्टीची कारवाई

महानगराध्यक्षांचा पक्षशिस्तभंगावर कडक निर्णय

जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कडक भूमिका घेत माजी नगरसेवकांसह एकूण २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षशिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे धोरण, निर्णय तसेच संघटनात्मक शिस्त न पाळता पक्षाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविल्यामुळे संबंधितांविरोधात कठोर पाऊल उचलण्यात आल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत झालेल्या पक्षाच्या बैठकीत सखोल चर्चा करून पक्षहित व संघटनात्मक शिस्त जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले.

हकालपट्टी करण्यात आलेल्यांमध्ये माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, गिरीष कैलास भोळे, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शातांराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, ज्योती विठ्ठल पाटील, मयूर श्रावण बारी, तृप्ती पाडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

हकालपट्टीत पाच माजी नगरसेवकांचा समावेश
या कारवाईत भाजपच्या पाच माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामध्ये माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, हर्षदा अमोल सांगोरे, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे आणि चेतना किशोर चौधरी यांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.