DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

प्रभाग क्रमांक ४ ब मध्ये चेतना किशोर चौधरी यांना नागरिकांचा उदंड प्रतिसाद

प्रचार रॅलीला शेकडो नागरिकांची उपस्थिती; रोड रोलर निशाणीलाच मतदारांची पसंती

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगतदार होत चालली असून, प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ४ ब मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी नगरसेविका सौ. चेतना किशोर चौधरी यांना नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आपल्या मागील कार्यकाळात प्रभागात केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर सौ. चेतना चौधरी यांनी यंदा पुन्हा उमेदवारी दाखल केली असून, त्यांच्या कामाची पोचपावती मतदारांकडून मिळत आहे. त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये तरुण, वृद्ध, महिला व पुरुषांचा मोठा सहभाग दिसून आला. प्रचार रॅली जोशी पेठ, पांझारापोळ चौक, भावसार मढी परिसर, रथ चौक, श्री पंत नगर, तेली चौक, बारीवाडा आदी भागातून काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या रॅलीत “पुन्हा चेतनाताईच हव्या” अशा घोषणा देत नागरिकांनी आपला निर्धार व्यक्त केला. रोड रोलर या निवडणूक निशाणीलाच पसंती देत मतदारांनी आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना सौ. चेतना चौधरी यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. स्वच्छ पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते, पुरेसा प्रकाश, सुरक्षितता आणि सार्वजनिक सोयीसुविधा या सर्व मूलभूत सुविधा प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. विकास करताना कोणताही भेदभाव न करता प्रत्येक गल्ला, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाचा समान विचार केला जाईल, असा विश्वासही त्यांनी मतदारांना दिला. “तुमचं मत अमूल्य आहे , तेच घडवेल आपल्या प्रभागाचं उज्ज्वल भविष्य…!” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

🗳 मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.