प्रतिभा पाटील यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
जामनेर : प्रतिनिधी
ग्रामसेवकासाठी आजी सोनियाचा दिनु, जळगांव जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जळगांव येथे ग्रामसेवक आदर्श पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
2014-2015,2015-16,2016-2017 या तीन वर्षाचे 42 ग्रामसेवकांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात आले. ग्रामसेवक आदर्श पुरस्कार जिल्ह्यातील जामनेर ता.मध्ये असलेले गाव आमखेडादेवी येथील श्री.प्रतिभा नवलसिंग पाटील यांना आज रोजी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात आला .
यावेळी ,श्री सुरेश भोळे श्री किशोर पाटील आमदार पाचोरा श्री अमन मित्तल जिल्हाधिकारी, श्री पंकज आशिया साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगांव, अती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री बी एम मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिकेत पाटील , श्री संजीवजी निकम साहेब राज्य अध्यक्ष, श्री नंदकुमार गोराडे जिल्हा अध्यक्ष, श्री बाबुलाल पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री संजय भारंबे सरचिटणीस, श्री अशोक खैरनार जिल्हा उपाध्यक्ष, श्री गौतम वाडे मानद सचिव, श्री विलास महाले आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमा उपस्थित वेळी श्री. अनिकेत पाटील साहेब यांनी कार्यक्रमाची रूपरेषाचे वर्णन केले. तसेच याठिकाणी श्री संजीव जी निकम साहेब, श्री राजू मामा भोळे ,श्री गुलाबराव पाटील यांनी सर्वांना संबोधित केले. अनेक वर्षा पासून जिल्हा ग्रामसेवक संघटनेने मागणी लावून धरली होती म्हणून त्यांचे आज सर्वत्र अभिनंदन केले आहे.