DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

“आणि महिला झाल्या रेडिओ जॉकी” : प्रसारणाची धुरा महिलांनी घेतली हाती..रेडिओ मनभावन 90.8 एफएम चा अभिनव उपक्रम

जळगाव  : प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबविले जातात जागतिक महिला दिनी रेडिओ मनभावन 90.8 एफ एम ने अभिनव उपक्रम राबविला. संपुर्ण महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमांची धुरा जळगाव शहरातील महिलांनी सांभाळत  महिला रेडिओ जॉकी झाल्या. विविध चर्चा आणि कार्यक्रम जसे की, मी स्त्री आहे , महिला दिन का साजरा करावा? यासोबतच विविध विषयांवर महिलांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त करत संचालन केले आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

 

 

के सी ई सोसायटी संचलित मुळजी जेठा महाविद्यालयातील रेडिओ मनभावन 90.8 एफ.एम. जळगाव हे सातत्याने समुदायासाठी जनजागृती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अनुसरून, विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असते. के. सी. इ. सोसायटी जळगाव चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे  यांच्या संकल्पनेतुन रेडिओ मनभावन 90.8 एफ. एम. ह्या सामुदायिक रेडिओ केंद्राची निर्मिती झाली. जागतिक महिला दिनी स्थानिक महिलांना व ए. टी. झांबरे विद्यालयाच्या शिक्षिका तसेच विद्यार्थी पालक ह्यांना रेडिओ जॉकी प्रशिक्षण देण्यात आले होते.

 

यावेळी  रेडिओ मनभावन सोबत काम करण्याची संधी मिळल्याने खुप आनंदी आहे.मागील एक वर्षापासुन मी रेडिओच्या विविध कार्यक्रमात सहभाग घेते.आज प्रथमच प्रत्यक्ष प्रसारणात श्रोत्यांशी संवाद साधला.असे योगिता पाटील यांनी सांगत रेडिओ मनभावन हा माझ्या घरातील सदस्य झाले असून, यापुढे सुध्दा रेडिओ कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले. तर  महिला दिनाचे विविध कार्यक्रम महिलांनी सादर करावेत ही संकल्पना खुपच आवडली व श्रोत्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी रेडिओ मनभावन ने उपलब्ध करुन दिल्याबद्द्ल मनस्वी आभारी आहोत असे प्रणिता झांबरे यांनी सांगितले. एम. जे. कॉलेज ची विद्यार्थिनी रेवती फिरके म्हणाली की, ज्या ग्रामिण क्षेत्रातून मी येते.  ग्रामिण भागातील मुलींमध्ये अनेक सुप्त गुण आहेत.मी रडिओ  सोबत जुळले व मला वाटते की रडिओ च्या माध्यमातुन त्यांना आपली प्रतिभा सादर करता येईल आणि हे योग्य व्यासपीठ असल्याचे सांगितले.

 

अर्पिता पाटील, रेवती फिर्के, विशृती राणे, गायत्री शिंदे, शितल कोल्हे, चेतना राणे, संजना शिवरामे, डॉ.सोनल महाजन, सुप्रिया महाजन, मनिषा ठोसरे, प्रणिता झांबरे, वर्षा चौधरी, पूनम कोल्हे, सुचिता शिरसाठे, रोहिणी पाटील,  तिलोत्तमा चौधरी, अंशरा अजीम , योगिता पाटील, ज्योती चौधरी.या महिलांनी रेडिओ कार्यक्रमात सहभाग नोंदविला . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडिओ मनभवान चे संचालक अमोल देशमुख, आरजे समृद्धी, आरजे स्वामी, ट्रान्समिशन ऑपरेटर राहुल पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.