पाचोरा येथे भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन
पाचोरा ;– येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली २१ रोजी कंत्राटी भरती संदर्भात राज्यातील लाखो तरुणांची फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा देत जोडे मारो निषेध आंदोलन केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सतत आरोप होत असलेल्या कंत्राटी भरती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय घेणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला पुराव्यानिशी उत्तर दिले. व सदर शासन निर्णय रद्द करण्याची काल घोषणा केली. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून शासनाच्या विविध विभागात कंत्राटी भरती निर्णय घेतल्याच्या विरोधात विविध ठिकाणी आंदोलने व महायुती सरकारवर वेळोवेळी टीका देखील केली गेली. परंतु सदर निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असताना त्यांच्या स्वाक्षरीने हा निर्णय घेतला गेला तसेच मागील काळात देखील राष्ट्रवादी कांग्रेस व काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी शासनामध्ये कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतल्याचे पुराव्यानिशी काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी पाचोरा व भडगाव यांनी विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाविकास आघाडीचा निषेध केला.व यावेळी पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारून राज्यातील तरुणांची दिशाभूल व फसवणूक केल्याबद्दल माफी मागा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला .
सदर फसवणूक करणाऱ्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याबद्दल आनंद देखील व्यक्त करत घोषणा दिल्या. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, ज्योती चौधरी, कांतीलाल जैन, रमेश वाणी, बन्सीलाल पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, दीपक माने, समाधान मुळे, जगदीश पाटील, शरद पाटील, सुनील पाटील, योगेश माळी, राहुल गायकवाड, भैया ठाकूर, वीरेंद्र चौधरी, रिंकू जैन, बाळू धुमाळ, रमेश शामनानी, टिपू देशमुख, रहीम बागवान, विनोद पवार, शहाजी बावचे, रामा जठार, हेमंत पाटील, आकाश लांडगे नकुल पाटील, बबलू मराठे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.