DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भवरलाल जैन यांना अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’ तुन आदरांजली

जळगाव  दि.२५ प्रतिनिधी : औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार मूल्ये रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलचे संस्थापक भवरलाल जैन यांचा आज श्रद्धावंदन दिन. त्यानिमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘भक्ती संगीत संध्ये’तुन विद्यार्थ्यांकडून किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी स्मरण केले.

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून ‘स्वरानुभूति’ या पद्मश्री भवरलाल जैन स्मृती संगीत समारोहात ‘भक्ती संगीत संध्या’ संपन्न झाली.  भाऊंच्या उद्यानामधील अॅम्पी थॅएटर येथे झालेल्या ‘भक्ती संगीत संध्या’ चे कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशन सिस्टीम चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन, प्राचार्य देबासिस दास, प्रविण जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. गुरू आणि शिष्य यांच्या नात्यातील भावार्थ समजून सांगणारे ‘ है प्रार्थना..’ याने भक्ती संगित संध्या ची सुरूवात झाली. समानता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींच्या ‘खरा तो एकची धर्म’ हे गीत सादर केले. भवरलाल जैन यांच्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. दुसऱ्यांची पिडा समजून त्यांच्या मदतीला धावून येणे म्हणजे पुरषार्थ असे ते मानत हेच अधोरिखित करणारे ‘वैष्णव जन तो..’ हे सादर करून विद्यार्थ्यांनी अहिंसा, सद्भावचा संदेश दिला. पवित्रता हे मनुष्याचे वैभव आहे हे सांगणारे ‘पवित्र मन रखो’ हे गीत सादर केले. यानंतर ‘श्री महालक्ष्मी स्तूती’ सादर झाली. उत्तरप्रदेशचे लोकगीत ‘बरसन लागी बदरीयाझूम झूम के’ सादर झाले. मनुष्याने अहंकाराचा त्याग करण्याचा संदेश देणारे संत कबिर यांचे ‘मत कर माया मत काया…’ ही रचना सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळवली. मिराबाई यांची ईश्वराप्रती निस्सीम भक्ती सांगणारी ‘मन चाह कर राखो जी…’ ही प्रस्तुती सादर केली. गुजराथी संगीत असलेले ‘आकाश गंगा’ सादर केली.तेरा मंगल मेरा मंगलने समारोप झाला. प्रा. शशांक झोपे यांनी प्रेक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक व आभार ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.