DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आदरणीय मोठे भाऊ यांच्या श्रद्धावंदन दिना निमित्त मदन लाठी यांचे ८३ वे रक्तदान

जळगाव – आज दि.२५ फेब्रुवारी २०२३ महत्वाचा दिवस म्हणजे श्रद्धेय पदमश्री डॉ भवरलालजी जैन ( अर्थातच आपल्या सर्वांचे मोठे भाऊ ) यांच्या श्रध्दावंदन दिनानिमित्त जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते & पत्रकार मदन रामनाथ लाठी यांनी आपले ८३ वे रक्तदान येथील  + इंडियन रेड क्रॉस सोसायटी  येथे केले .

मदन लाठी यांचा आयुष्याचा रक्तदानाचा प्रवास चोपडा येथे कला, शास्त्र, वाणिज्य महाविद्यलयात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्प मध्ये सत्र!सेन येथे सुरवात झाली . त्यानंतर जसा जसा त्यांचा आयुष्याचा प्रवास होत गेला तिथे तिथे ते रक्तदान करीत गेले त्यात  जास्त  जळगाव येथे, नागपूर, शिर्डी, मागील ४ वर्षांपासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत पिंपरी चिंचवड येथील वाय सि एम येथे & नांतर  १४ नोव्हेंबर & आज दिनांक २५ फेब्रुवारी असे करत गेले . 

 

त्यांनी आज पर्यंत ८१ वेळेस साधे रक्तदान & २ वेळेस प्लास्मा ( देऊन ४ रुग्णांना पुणेत  जीवनदान मिळाले आहे ) त्यांचा या कार्य बद्दल त्यांचे  गुरु आदरणीय भाऊ , मोठे बंधू यांनी वेळो वेळी कौतुक केले आहे. २०२२ मध्ये त्यांना महाराष्ट्र माहेश्वरी युवा संघटनने कोरोना योद्धा सन्मान पात्र दिले असून त्या काळात पुणे & जळगाव येथे त्यांचा विविध संघटने तर्फे सत्कार करण्यात आला आहे. २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री डा हर्षवर्धन यांनी मदन लाठी चे या करीत असलेल्या कार्य बद्दल कौतुक केले आहे & त्याबरोबर विविध शासकीय अधिकारींनी सुद्धा कौतुक  केले आहे. 

“रक्तदान म्हणजे सर्वश्रेठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वछंदी रक्तदानकरून आणि कुणास जीवनदान देवून लाडके देवाचे व्हावे .” हे ब्रीदवाक्य लाठीनी ठरविले आहे.  .  ऑक्टोबर २०२१ मध्ये  आपल्या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविंद सिरांचा ७६ वा वाढदिवस & त्याच वेळी मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान म्हणजे तो एक योगायोगच म्हणावा लागेल . त्यानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी त्यांचे अभिनंदन केले होते . त्यानंतर विविध दिवस & एक रक्तदानानंतर ३ महिन्याचा विश्रांती देऊन पुन्हा तीन महिन्याने रेगुलर करीत राहिले त्यात  २ जानेवारी  २०२२ महाराष्ट्र पोलीस स्थापणा दिवस, १ मे महाराष्ट्र कामगार दिवस, १५ऑगस्ट २०२२  आपल्या देशाचा ७५ व आझादीका महोत्सव, १४ नोव्हेंबर २०२२ & आज २५ फेब्रुवारी  २०२३ असे रक्तदान करीत आहे. लाठीचा वयाचा ६५ वर्षांपर्यंत  डॉक्टरांच्या सल्यानुसार ते रक्तदान करीत राहणार आहेत & इतरांना प्रोत्साहित करीत आहे. त्यांच्या आजच्या उपक्रमाबद्दल जैन उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय श्री अशोक भाऊ यांनी त्यांचे अभिनंदनद्या उपक्रमाबद्दल कौतुक केले आहे . मदन लाठी या बरोबर विविध सामाजिक कार्य & पत्रकारिता करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.