भोलाणे येथे लाकडी दांडा व पट्टीने एकास बदडले
जळगाव;-पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना याचा जाब विचारला असता याचा राग येऊन एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुचाकी ला लावलेल्या लोखंडी पट्टीने मारून दुखापत केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विलास तुळशीराम कोळी वय 41 हे हात मजुरी करीत असून तालुक्यातील मुलाने येथे राहतात. अकरा रोजी आरोपी मयूर ज्ञानेश्वर नन्नवरे राहणार मुलाने याने विलास कोळी यांची पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना पाण्याची कॅन का घेऊन जात आहे असे विचारण्याचा राग आल्याने आरोपीने विलास कोळी यांना शिव्या गाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करीत मोटरसायकलच्या चावीला असलेल्या लोखंडी पट्टीने मांडीवर मारून दुखापत केल्याचा प्रकार घडला. याबाबत विजय कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मयूर नन्नवरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विलास शिंदे करीत आहे.