Bigg Boss 15 OTT च्या नव्या घराचे फोटो आले समोर!
ओमंग कुमार आणि त्यांच्या पत्नी वनिता यांनी कार्निव्हल लूकमध्ये डिझाइन केले ‘बिग बॉस’चे घर, बघा फर्स्ट लूक
बिग बॉस १५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. त्या आधी बिग बॉसच्या घराचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात बिग बॉसच्या घराचा नवा चेहरा पहायला मिळत आहे. बिग बॉसचे हे पहिले पर्व आहे जे टेलिव्हिजन नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. बिग बॉस १५ ओटीटी करण जौहर होस्ट करत आहे. प्रोमोमध्ये करणने बिग बॉसच्या घराचे दरवाजे उघडले. ‘आता काही दिवसांची प्रतिक्षा,आम्ही थाळी घेऊन आरतीसाठी तयार आहोत’,असे म्हणत बिग बॉस १५ ओटीटीचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
घरासाठी हटके थीम
- लिव्हिंग रूम आणि गार्डनमध्ये स्लायडिंग डोरचा वापर केला आहे, दरवाजे उघडल्यानंतर ते आणखीच सुंदर दिसेल.
- बंक बेड म्हणजे या बाजेचा वापर केला आहे. यात आरामदायक असतात. बेडरूमलादेखील कार्निव्हल लूक दिला आहे.
- स्वयंपाकघर कलरफुल ठेवले आहे तर स्नानगृहाचा रंग मंडपासारखा केला आहे.
- भिंतीवर बाबू आणि फुलांच्या डिझाइन काढल्या आहेत.
कला दिग्दर्शक ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता यांनी संपूर्ण घराचे डिझाइन केले आहे.
याबद्दल ओमंग याबद्दल सांगतात, ‘आमचे मुख्य लक्ष घराला जिप्सी आणि कार्निव्हल लूक देण्याचे होते. आम्ही या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहोत. लोकांना नक्कीच हा बदल आवडेल.’
ओमंग याबद्दल सांगतात, “या सीझनमध्ये मुख्य प्रस्ताव हा ओव्हर द टॉप तत्व जिवंत ठेवण्याचा होता. आम्ही बिग बॉस ओटीटी हाऊससाठी बोहेमियन, जिप्सी, कार्निवल लुक निवडला आहे. तसेच, जेव्हा
स्पर्धक येथे पोहोचतील तेव्हा त्यांना असे वाटायला हवे की, त्यांना बराच काळ येथे राहावे लागेल हा हेतूदेखील आम्हाला साध्य करायचा आहे.”
यंदाच्या बिग बॉस १५ मध्ये एकूण १५ सेलिब्रेटी स्पर्धक सहभागी होणार आहेत. ८ ऑगस्ट पासून बिग बॉस १५ प्रेक्षकांना २४ तास ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. बिग बॉसचे हे पर्व इतर पर्वांपेक्षा वेगळे असणार आहे अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. बिग बॉस सुरू झाल्यानंतर नेमकं काय पहायला मिळणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
बिग बॉस १५ मध्ये अभिनेत्री अक्षरा सिंह, करण नाथ, नेह भसीन, प्रतिक सहजपाल, दिव्या अग्रवाल, अनुषा दांडेकर, रिद्धिमा पंडित, त्याचप्रमाणे उर्फी जावेद,मनस्वी वशिष्ठ, जीशान मलिक, नेहा मलिक आणि पवित्र लक्ष्मी हे स्पर्धक म्हणून बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत.