DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मंत्री अनिल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात रक्तदान शिबीर

अमळनेर : महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात ७ जुलैला रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यासाठी रक्तदात्यांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार असून हे शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. या वेळी स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या दात्यांना भेट वस्तू देण्यात येणार आहे. येथील जीवनश्री रक्तपेढी व धुळ्यातील जीवन ज्योती रक्तपेढी यांच्यातर्फे रक्त संकलन करण्यात येणार आहे. या शिबिराचे आयोजन ना. अनिल भाईदास पाटील मित्र परिवाराने केले आहे. सद्यस्थितीत रक्ताचा तुटवडा व रक्ताची गरज लक्षात घेता, हे शिबीर आयोजित केले असून अधिकाधिक दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.