मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे नेते जेलमधील जातील अशी उघडपणे शिंदे गट आणि भाजप नेत्यांकडून इशारा दिला जात होता. अखेरीस आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मुश्रीफ यांच्या घरी ईडीची टीम तळ ठोकून आहे. तर दुसरीकडे, त्यांचे भागीदार आणि समर्थकांवर पुण्यात धाड टाकण्यात आली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. त्यांच्या कागलमधील घरावर छापे टाकले आहेत. त्यांच्या मुलाच्या घरावरही छापे पडले होते. या प्रकरणी ईडीने कारवाई केली आहे. ईडी पुण्यात पुण्यात सुद्धा छापे टाकले आहे. पुण्यात ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावर छापे टाकले आह. कोरेगाव पार्क आणि गणेशखिंड रोडवर छापेमारी सुरू आहे. चंद्रकांत गायकवाड हे मुश्रीफांच्या भागीदार आहे.
तर तिकडे, मुश्रीफ यांच्या कागलमध्ये ईडीच्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. कागलमध्ये दुकानं बंद करण्यात आली आहे. समर्थकांनी मुश्रीफ यांच्या घरासमोर गर्दी केली आहे. आज दुपारी मुश्रीफ पत्रकार परिषद घेणार आहे.
काही दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांचावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते. 2700 पानी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या कार्यालयात पोहोचले होते. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. यासाठी पुरावे घेऊन सोमय्या ईडीच्या ऑफिसमध्ये गेले होते. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले, अशी माहिती सोमय्यांनी दिली होती.