DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेरात शिंदे गट पदाधिकाऱ्यांकडून फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड

अमळनेर : वसुलीसाठी घरी गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवले म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) (Balasaheb’s Shiv Sena (Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी बजाज फायनान्सच्या (Bajaj Finance)  कार्यालयाची तोडफोड केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार (Prathamesh Pawar) यांनी घेतलेल्या पर्सनल लोनचा एक हफ्ता थकल्याने बजाज फायनान्सचे कर्मचारी त्यांच्या घरी गेले होते. 

हेहि वाचा ; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

 

मात्र पत्नी एकटी घरी असताना वसुली कर्मचाऱ्यांनी दादागिरी केली. अशा अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या म्हणून संतप्त पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) सायंकाळी न्यू प्लॉट भागातील बजाज फायनान्स कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील कर्मचारी घाबरून पळून गेले. कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक यांची तोडफोड करण्यात आली. याबाबत शाखा व्यवस्थापक विकास सुभाष पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.