महूखेडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत काठेवाडी यांची निवड
जामनेर : तालुक्यातील महूखेडा ग्रामपंचायत सरपंच पदी भरत गबरू काठेवाडी यांची नियुक्ती झाली आहे. महूखेडा ग्रामपंचायती येथील सरपंचाने राजीनामा दिल्याने हि जागा रिक्त झाली होती. यावतीने दिनांक १६ रोजी ग्रामपंचायत सरपंच निवडीसाठी मतदान करण्यात आले.या मतदान प्रक्रियेत नऊ जागांपैकी पाच जागा भरत गबरू काठेवाडी च्या बाजूला मिळाल्याने त्यांची आज सरपंच पदासाठी निवड करण्यात आली आहे.
सरपंच नियुक्ती वेळी उपस्थित कविता पाटील,कलाबाई पवार,यमुना बाई पवार,सुर्यमान भिल, तसेच होळहवेली येथील सर्व काठेवाडी परिवारातर्फे भरत गबरू काठेवाडीना शुभेच्छा दिल्या.होळहवेली येथील भरत काठेवाडी हे भाजप पक्षाचे सर्वांचे आवडते आहे व त्यांचा मनमिळाऊ स्वभाव असल्याने अभिनंदन करतेवेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सह भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितेंद्र पाटील,आनंदा लावरे, विलास पाटील, नगरसेवक बाबुराव हिवराळे, प्रल्हाद पाटील, रामसिंग पवार, भागवत पाटील,सुनंदा पाटील,नवलसिंग पवार, माणिक पाटील, ज्ञानेश्वर पवार, निरंजन वाघ, भगवान चव्हाण,रमेश पवार, परमेश्वर लावरे,आदि पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित सरपंच भरत काठेवाडी यांचा सत्कार केला.