DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर !

दिव्यसार्थी ऑनलाईन डेक्स  : राज्यातील ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या 34 जिल्ह्यांतील 7751 ग्रामपंचायती, नवनिर्मित 8, तसेच गेल्या निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 7751 निवडणुकांबाबत मोठं अपडेट समोर आलं आहे. या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या सर्व निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतचे सर्व आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित विभागला दिले असून एका नोटिसीद्वारे वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यामुळे आता दिवाळीचे फटाके वाजल्यानंतर गावकीच्या कारभारावर मांड ठोकण्यासाठी प्रचाराचे फटाके महिनाभरात वाजणार असल्याने गावागावांत राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

 

 

असा असणार निवडणुकीचा कार्यक्रम. . .  

राज्यातील 34 जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 28 नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 7 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे अन् त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केलं जाणार आहे. निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे तर 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानानंतर दोन दिवसानंतर म्हणजे 20 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील 7751 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. गावामध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात होणार आहे.

 

पहा निवडणुकांच्या तारखा… 

तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याची तारीख :- 18 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची तारीख :- 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
अर्जाची छाननी होणारी तारीख :- 05 डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची तारीख : 7 डिसेंबर
निवडणूक चिन्ह वाटपाची तारीख : 7 डिसेंबर दुपारी 3 नंतर…
मतदानाची तारीख : 18 डिसेंबर
मतमोजणी आणि निकाल : 20 डिसेंबर
निकालाची अधिसूचना : 23 डिसेंबर

 

जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचातींची संख्या पहा. . .

बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, एकूण – 7,751.

 

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.