धनुष्यबाण आम्हालाच द्या, शिंदेंची पुन्हा निवडणूक आयोगात धाव
मुंबई | शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टानंतर आता निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कागदपत्र सादर कारण्यासाठी शुक्रवार (दि.७) पर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात तात्काळ सुनावणी घ्यावी अशी विनंती केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी एकही कागदपत्र सादर केलेला नसून ते जाणूनबुजून वेळ काढत असल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.
दरम्यान, शिवसनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? यावर निवडणूक आयोग उद्या निर्णय देण्याची शक्यता आहे. तसेच शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला उद्या निवडणूक आयोगापुढे कागदपत्र सादर करावे लागणार आहेत.