DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वंदे भारत एक्सप्रेसचा मोठा अपघात !

मुंबई : मुंबईहून गुजरातमधील गांधीनगरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आज मोठा अपघात झाला. वाटवा आणि मणिनगर स्थानकांदरम्यान म्हशींच्या कळपावर रेल्वेची धडक झाली. अपघातात काही म्हशींचा मृत्यू झाला तर रेल्वेच्या इंजिनचा काही भाग तुटला. पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी जेके जयंत यांनी सांगितले की, हा अपघात सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास झाला.

रेल्वे प्रवक्त्याने सांगितले की, ट्रेन मुंबईहून गांधीनगरला जात होती. अचानक ३-४ म्हशी गैरतपूर-वटवा स्थानकादरम्यान रुळावर आल्या. यामुळे ट्रेनच्या पुढील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, ट्रेनमध्ये कोणतीही अडचण आली नाही. मृत म्हशींना काढल्यानंतर, गाडी ८ मिनिटांनीच पुढे रवाना झाली आणि ती वेळेवर गांधीनगरला पोहोचली. ते म्हणाले की, आजूबाजूच्या गावातील लोकांना रेल्वेकडून समजावून सांगितले जात आहे की, ट्रॅकच्या आजूबाजूला जनावरे उघडी सोडू नका.

 

गेल्या ३० सप्टेंबर रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. नवीन अपग्रेडसह, ही ट्रेन जास्तीत जास्त १८० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. मात्र, सध्या त्याचा कमाल वेग १३० किमी प्रतितास निश्चित करण्यात आला आहे. गुजरातची राजधानी गांधीनगर आणि मुंबई दरम्यान ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावते. ही एक्सप्रेस ५१९ किमी अंतर ६ तासांत कापते.

वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल स्टेशनवरून सकाळी ६.१० वाजता सुटते, रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते. ट्रेन सुरतला ८.५० वाजता पोहोचते आणि ८.५३ वाजता सुटते. वडोदरा येथे १०.२० वाजता पोहोचते. पाच मिनिटे थांबल्यानंतर ती अहमदाबादसाठी निघते. त्यानंतर ही ट्रेन गांधीनगर स्टेशनला ११.४० वाजता पोहोचते.

परतीच्या दिशेने 20902 अप ट्रेन गांधीनगरमधून दुपारी ०२.०५ वाजता सुटते. २:४५ वाजता अहमदाबादला, ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ४ वाजता वडोदरा आणि नंतर ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ५:४० वाजता सुरतला पोहोचते. सुरत येथून संध्याकाळी ५:४३ वाजता सुटते आणि ८.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.