पितृ पक्षात दान करणे मानले जाते शुभ, ‘या’ वस्तूंचे दान केल्याने मिळतो आशीर्वाद!
दिव्यासार्थी ऑनलाईन डेक्स : हिंदू धर्मात पितृ पक्षाचे महत्त्व सांगितले आहे. पितृ पक्षाच्या दिवसांत आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्यामध्ये राहून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अन्न-पाणी घेतात, अशी श्रद्धा आहे. असे मानले जाते की जर आपण आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी काही कार्य केले तर आपल्याला त्यांचे पूर्ण आशीर्वाद मिळतात. त्याचप्रमाणे या काळात काही गोष्टींचे दान करण्याचाही सल्ला दिला जातो, जेणेकरून पितरांच्या आत्म्याला शांती मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की पितृ पक्षात कोणत्या गोष्टी दान कराव्यात.
काळे तीळ करावे दान ?
श्राद्धामध्ये पूर्वजांची पूजा करण्यासाठी काळे तीळ वापरले जातात. असे मानले जाते की, काळे तीळ भगवान विष्णूंना आवडतात. श्राद्ध दरम्यान दान करताना तुमच्या हातात काळे तीळ असायला हवेत. जर तुम्ही काहीही दान करू शकत नसाल तर फक्त काळे तीळ दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो अशी देखील मान्यता आहे.
चांदी
पूर्वजांचे निवासस्थान चंद्राच्या वरच्या भागात असते अशी मान्यता आहे. यामुळेच म्हणून चांदीच्या वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते.
गूळ आणि मीठ
पितृ पक्षात गूळ आणि मीठाचे दान केल्याने आशीर्वाद मिळतात असे माने जाते. या वस्तू दान करणे खूप शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात वाद किंवा भांडण होत असतील तर श्राद्धात गूळ आणि मीठाचे दान अवश्य करावे.
वस्त्र दान
असे मानले जाते की, पितृ पक्षात तुम्ही ज्यांना जेवू घालत आहात. मग ते गरीब असो किंवा ब्राम्हण त्यांना वस्त्र दान करा. जर तुम्ही ब्राम्हणाला दान करत असाल तर धोती, टोपी किंवा गमछा दिला जातो.
चप्पल करा दान
पितृ पक्षातील पितरांच्या तृप्तीसाठी गरीबांना जोडे किंवा चप्पल दान केल्याने पित्र प्रसन्न होतात आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. असे केल्याने शनि आणि राहूचे दोषही संपतात.