DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सहलीला गेलेले चौघे पाण्यात बुडाले; एक बेपत्ता

 

जळगाव : प्रतिनिधी 

कांताई बंधाऱ्याकडे सहलीला गेलेले योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४) या बहिण भावासह समीक्षा विपीन शिरोडकर (वय १७) व नयन योगेश निंबाळकर (वय १७) सर्व रा. मिथीला अपार्टमेंट, दूध फेडरेशन, जळगाव) ही चार मुले दुपारी पाण्यात बुडाले. नयन वगळता अन्य तिघांना वाचविण्यात यश आले आहे. नयनचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरु होता. तिघांवर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथीला अपार्टमेंटमधील १२ ते १५ मुलं-मुली सण्डे पिकनीक म्हणून तालुक्यातील धानोरा शिवारातील कांताई बंधाऱ्यावर फिरायला गेले. तेथे फिरणं झाल्यानंतर गिरणा नदीत नागाई जोगाई मंदिर परिसरात पाण्यात उतरले. तेथे फोटो सेशन केले. पाण्याचा अंदाज न आल्याने योगीता व सागर या बहिण भावासह समीक्षा शिरोडकर व नयन निंबाळकर हे पाण्यात बुडाले. हा प्रकार इतर सहकारी मित्रांनी चौघांनी वाचविण्याचा प्रयत्न केले.

त्यात तिघांना बाहेर काढण्यात यश आले तर नयन वाहून गेला. मनपा व स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने नयनचा उशिरापर्यंत शोध सुरु होता. दोन दिवसापूर्वीच कांताई बंधाऱ्यावर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी गेलेल्या भगवान नामदेव राठोड (वय १८, रा. समता नगर) या तरुणाचा कांताई बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर लागलीच आज पुन्हा चार मुलं बुडाले.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.