संत नामदेव महाराजांचे १७ वे वंशज यांचे जळगाव रेल्वेस्थानकावर भव्य स्वागत !
जळगाव | प्रतिनिधी
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर संपूर्ण विश्वाचे व करोडो राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी जळगाव १९ जानेवारी रोजी जळगाव रेल्वे स्थानकावरून कृषीनगर एक्सप्रेसने अयोध्येला जात असतांना संत नामदेव महाराजांचे १७ वंशज हभप निवृत्ती व मुरारी नामदास महाराज व १० वारकरी बांधवांचे प्रभु श्रीराम च्या जयघोषात स्वागत करण्यात आले.
जळगाव रेल्वे स्थानकावर श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव तसेच गणनाम परीवार राम भक्तांच्या वतीने त्यांचा पुष्पहार व संस्थेचा मानाचा गमछा व भगवी शाल देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ समाजसेवक एकनाथ बबन टेलर यांनी खास राममंदिर सोहळ्या अयोध्येसाठी ५१ इंचचा श्रीरामाचा मोठा मंगल बॅच महाराजांना सुपूर्त केला. खान्देशचे प्रसिद्ध असलेले वांग्याचे भरीत कळण्याची भाकर ठेचा दत्तात्रय वारुळे व मनोज भांडारकर यांनी दिला.
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक जगताप, सचिव अनिल खैरनार, कोषाध्यक्ष चेतन खैरनार, मनोज भांडारकर, सुरेशदादा सोनवणे, गणनाम परिवाराचे छोटू भाऊ नेवे, राकेश शिरसाठ, बापू खैरनार, सुधाकर कापुरे, संभाजी शिंपी, राजेंद्र शिंपी, प्रा.आर. बी. पाटील, दत्तात्रय वारुळे. एकनाथ सोनवणे, तुषार शिंपी, अनिल पाटील, रामचंद्र माळी, किशोर येवले, संतोष काळे, राजेंद्र वारूळे, बाल रामसेवक, प्रज्वल जगताप सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी प्रभू श्रीरामाचा जयघोष देऊन महाराज यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.