DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भव्य शोभा यात्रेने सुरु होणार श्रीराम कथेचे आयोजन

जळगाव | प्रतिनिधी
श्रीराम जन्मभूमी दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा निम्मित जळगाव येथे दिनांक २० ते २४ जानेवारी रोजी जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ) येथे दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ या वेळेत श्री. चिमुकले राम मंदिराचे ह.भ.प. परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेचे वाचन करण्यात येणार असून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या प्रेरणेतून जळगाव शहरात सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व आमदार राजूमामा भोळे मित्र परिवार यांच्या वतीने जळगाव शहरात भव्य श्रीराम रामकथेचे आयोजन करण्यात असून याची सुरवात उद्या दिनांक २० जानेवारी शनिवार रोजी नवीन बस स्टँड समोरील श्री. चिमुकले राम मंदिर येथून भव्य श्रीराम कथेची शोभा यात्रेला सकाळी ११ : ०० वाजता सुरवात होऊन, शोभा यात्रेचा समारोप दु. १२:०० जी.एस. ग्राऊंड (शिवतिर्थ) येथे होईल व या ठिकाणी दुपारी. ०१ ते सायंकाळी ०५ ह.भ.प. परमपूज्य श्री. दादा महाराज जोशी यांच्या सुंदर वाणीतून श्रीराम कथेला सुरवात होईल. तरी या प्रसंगी जल्गओन शहरातील सर्व राम भक्त बंधू, भगिनी, महिला भजीनी मंडळ, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्यने शोभा यात्रेत व कथेत सहभाग घेऊन व उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजन समितीचे सर्व श्रीराम भक्त, शिवमहापुराण समिती व आ. सुरेश भोळे (राजूमामा), नितीनभाऊ लढ्ढा, राजूशेठ बांगर, देवेंद्र अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, अशोक जाजू, यशवंत बारी, नितीन पाटील, अशोक राठी, श्याम जोशी, श्रीनिवासजी व्यास, संजय व्यास, मनीष बाहेती, मनीष झंवर, रामदयाल सोनी, कांजी सोनी, रामलालजी, मनोज भांडारकर व राजूमामा भोळे मित्र परिवार, यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.