DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या तिघांची पंच व तांत्रिक अधिकारीपदी निवड

जळगाव | प्रतिनिधी
६ वी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा २०२३ चे आयोजन दि. २१ ते २६ जानेवारी २४ दरम्यान कोईमतूर तामिळनाडू  झाले होते. बास्केटबॉल या खेळाच्या स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मिक पाटील (हटकर) सहप्रशिक्षक व धनदाई माता महाविद्यालयाची विद्यार्थीनी मनिषा हटकर व मुळजी जेठा महाविद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू सोनल हटकर अशा तिघांची या खेळासाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती केली होती. यापूर्वीही यांची विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंच व तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. वाल्मिक पाटील, मनिषा हटकर व सोनल हटकर यांच्या नियुक्तीचे पत्र बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कुलविंदरसिह गिल यांच्यावतीने देण्यात आले. त्यांच्या नियुक्ती बद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जैन स्पोर्ट्स चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य एल. बी. देशमुख, क्रीडा संचालक सुभाष वानखेडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक दिनेश पाटील, प्राचार्य डॉक्टर अशोक राणे, क्रीडा संचालक श्रीकृष्ण बेलोरकर, यशवंत देसले, निलेश जोशी, प्रवीण कोल्हे, रणजीत पाटील, धनदाई माता महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल पाटील, किशोर पाटील क्रीडा संचालक शैलेष पाटील व जिल्ह्यातील सर्व क्रीडाप्रेमींनी कौतूक केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.